गतिरोधकासाठी नेवासाफाटा येथे विद्यार्थ्यांचा रास्तारोको

गतिरोधकासाठी नेवासाफाटा येथे विद्यार्थ्यांचा रास्तारोको

नेवासाफाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

नेवासा फाटा येथील राजमाता आहील्यादेवी होळकर चौकामध्ये गतिरोधक बसवण्यासाठी मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे यांनी शाळेतील मुलांना व पालकांना घेऊन 20 मिनिटे रास्तारोको आंदोलन केले.

याप्रसंगी मुकींदपूर व मक्तापूर परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी संतोष साळवे, गुलाब साळवे, गंगाराम बर्वे, बाळासाहेब सोनवणे, दत्ता घुले, संजय वाकडे, संदीप जाधव, श्रीकांत देवकाते, अशपाक शेख, पोपट देवकाते, राजेंद्र मिसाळ, प्रदीप साळवे, अन्वर पठाण, शबाना शेख, सुनील दाविद साळवे, प्रमोद मच्छिंद्र खंडागळे, जाफर शेख, प्रकाश साळवे, माणिक डुकरे आदी उपस्थित होते.कोणताही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही असे मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com