विशेष पथकाचे जुगार, दारू अड्ड्यावर छापे

तिघांना अटक
विशेष पथकाचे जुगार, दारू अड्ड्यावर छापे

अहमदनगर|Ahmedagar

अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पाथर्डी, कर्जत तालुक्यात जुगार व दारू अड्ड्यावर छापे टाकले. या छाप्यादरम्यान रोख रक्कम, जुगार साहित्य व देशी दारू असा 7 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे.

पाथर्डी व कर्जत तालुक्यात जुगार व दारू अड्ड्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना माहिती मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी यांच्या पथकाला कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. पथकाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी संभाजी विठ्ठल गार्डे व शेरखान शेख (दोघे रा. तिसगाव ता. पाथर्डी) हे जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 हजार 380 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरूद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून अय्यास रहीम शेख (रा. माहीजळगाव ता. कर्जत) याला अटक केली. त्याच्याकडून 1 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली आहे. माहीजळगाव येथील देशी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 520 रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com