एसपींनी आदेश देताच पोलिसांचे हातभट्टी अड्ड्यांवर छापे

नगर शहर, तालुक्यासह शेवगावमध्ये कारवाई
एसपींनी आदेश देताच पोलिसांचे हातभट्टी अड्ड्यांवर छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश देताच स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रविवारी, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर तालुका व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत सहा ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्ठी व ताडी विक्री दुकानावर छापे टाकून कारवाई केली. या प्रकरणी सात जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एसपींनी आदेश देताच पोलिसांचे हातभट्टी अड्ड्यांवर छापे
उड्डाणपुलाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरला

सहा ठिकाणी केलेल्या कारवाईतून एक लाख 78 हजार रूपयांचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साधने, दोन हजार 600 लीटर कच्चे रसायन, 285 लीटर तयार दारू व 180 लीटर ताडीचा साठा जप्त करून नष्ट केला आहे. दारू तयार करून विक्री करणारे अर्जुन भिवाजी गव्हाण (रा. वाळुंज ता. नगर), महिपती महादेव पवार, सोमनाथ नारायण पवार, मच्छिंद्र लहानु पवार (तिघे रा. साकत ता. नगर) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दशरथ श्रीपती कडमिंचे (रा. नेवासा रोड, शेवगाव), भगवान विठ्ठल गाढे (रा. शेवगाव) व गणेश पवार (रा. पाथर्डी) यांच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एसपींनी आदेश देताच पोलिसांचे हातभट्टी अड्ड्यांवर छापे
पंचनाम्यासाठी मागितले पैसे; कृषी सहायक निलंबित

पोलीस अधीक्षक ओला, निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्‍वर शिंदे, संतोष लोंढे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, पालवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एसपींनी आदेश देताच पोलिसांचे हातभट्टी अड्ड्यांवर छापे
चोरट्यांनी सोयाबीनच्या गोण्यांवर मारला डल्ला

भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

भिंगार कॅम्प पोलिसांनी दारू तयार करून विक्री करणार्‍यावर कारवाई करत एक लाख 66 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगारमधील ब्रम्हतळे, घास गल्ली येथे सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संतोष गोवर्धन पवार, पप्पू ऊर्फ गोकुळ अनिल पवार, भाऊ भिंगारदिवे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवालीने देशी-विदेशी दारू पकडली

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौकात आण्णाचा ढाबा या हॉटेलवर कारवाई करून पाच हजार 630 रूपये किंमतीची देशी दारू पकडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ राऊत यांच्या फिर्यादीवरून शोएब अशपाक शेख (वय 18 रा. केडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com