अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर मनपाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Commissioner Dr. Pankaj Jawale) व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (ZP CEO Ashish Yerekar) यांच्या पाठोपाठ सायबर गुन्हेगारांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनाच आपल्या हुशारीची झलक दाखवली आहे.
एसपी ओला यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook Account) सुरू करून व त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर ज्यांनी ती स्वीकारली. त्यांना विविध बहाण्याने पैसे मागण्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी (Cyber Police) फेसबुक कंपनीला ई-मेल पाठवून पोलिस अधीक्षकांच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook Account) काढून टाकण्याची विनंती केली आहे व दुसरीकडे प्रत्यक्ष पोलिस अधीक्षक ओला यांनीही जाहीर आवाहन करताना, कोणीही या फेक अकाउंटच्या फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारू नये व कोणाला पैसेही देऊ नयेत, असे आवाहन केले आहे.
आयुक्त डॉ. जावळे व सीईओ येरेकर यांच्या नावानेही अशाच पद्धतीने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून व त्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली गेली होती. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात म्हटल्यावर अनेकांनी ती स्वीकारली. मात्र, नंतर त्यांना काही ना काही कारणाने पैसे (Money) मागण्यास सुरुवात झाल्यावर काहींना संशय आला व त्यांनी संबंधित अधिकार्यांना विचारणा केल्यावर फेसबुकवर त्यांच्या नावाने बनावट अकाउंट (Fake Facebook Account) तयार झाल्याचे लक्षात आले. अगदी असाच प्रकार पोलिस अधीक्षक ओला यांच्याबाबतही घडला आहे. मात्र, यातून सायबर गुन्हेगारांनी (Cyber Police) प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांच्या नावाचा सुरू केलेला दुरुपयोग चिंतेचा झाला आहे.
कोणीतरी माझ्या नावाने फेक प्रोफाईल बनवले आहे आणि प्रत्येकाला माझ्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. कृपया हे स्वीकारू नका. तो वेगवेगळ्या बहाण्याने पैसे मागत आहे.
- राकेश ओला, पोलीस अधीक्षक