नूतन पोलिस अधीक्षक ओला यांनी स्वीकारला पदभार

पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola)
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिवारी रात्री उशिरा नगर येथे कार्यभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना कार्यभार सोपवला.

नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक असलेले ओला यांची नगरच्या पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा त्यांनी नगर येथे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, तोफाखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगारचे शिशिरकुमार देशमुख, नगर तालुका पोलीस ठाण्याचे राजेंद्र सानप, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे युवराज आठरे आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मी रविवार पासूनच कामाला सुरुवात करत आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी विशेष लक्ष देणार आहे. नागरिकांना कुठलीही तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे अधीक्षक ओला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com