दहेगावला सोयाबीन पाण्यात !

बाधित पिकांचे पंचनामे करावेत- भगवानराव डांगे
दहेगावला सोयाबीन पाण्यात !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दोन दिवस सलग झालेल्या पावसाने दहेगाव (Dahegav) येथील शेतकर्‍यांच्या शेतातील सोंगलेली सोयाबीन (Soybeans) अक्षरश: पाण्यातून काढण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

सोयाबीनची (Soybeans) काढणी बहुतांशी भागात सुरू झाली आहे. त्यातच परतीच्या पावसाचे थैमान यामुळे शेतकर्‍यांनी शेतात सोंगलेल्या सोयाबीन (Soybeans) गोळा करण्यासही पावसाने उसंत दिली नाही. परिणामी दहेगाव (Dahegav) येथील शेतकर्‍यांना पाण्यातून सोयाबीन (Soybeans) गोळा करावी लागली. बहरलेली पिके (Crops) काढणीस आलेली असताना पावसाने ही स्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोयाबीन पाण्यात (Soybeans Under Water) भिजल्याने त्यास मोड फुटण्याची तसेच त्याची प्रतवारी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान (Loss) होऊ शकते. असे दहेगाव येथील शेतकरी व माजी सरपंच भगवानराव डांगे यांनी सांगितले.

डांगे यांच्या शेतात सोयाबीन सोंगून गंज घातलेले होते. परंतु पावसाने शेतात तळे निर्माण झाले. परिणामी त्यांच्या शेतातील सोयाबीन पाण्यात बुडाले होते. सोंगलेले सोयाबीनचे गंज पाण्यात भिजल्याने त्यांना मोठा अर्थिक फटका बसू शकतो. या भागातील सोयाबीनचे (Soybeans) पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.