चोरट्यांनी सोयाबीनच्या गोण्यांवर मारला डल्ला

चोरट्यांनी सोयाबीनच्या गोण्यांवर मारला डल्ला

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील शिबलापूर (Shibalapur) शिवारात 36 हजार रुपये किमंतीचे सोयाबीन चोरीस (Soybeans Theft) गेल्यामुळे सिताराम बाळकृष्ण नागरे या शेतकर्‍यावर मोठे अर्थिक संकट कोसळले आहे. तर यामुळे शिबलापूर (Shibalapur) सह पंचक्रोशीतील शेतकर्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

चोरट्यांनी सोयाबीनच्या गोण्यांवर मारला डल्ला
उड्डाणपुलाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरला

शिबलापूर - पानोडी रस्त्यावर शेतकरी बाळकृष्ण नागरे यांची शेती व वस्ती आहे. त्यांनी शेतातून चार-पाच दिवसांपूर्वी सोयाबीन (Soybeans) काढणी करून 8 गोण्यांमध्ये भरून वस्तीवरील शेडमध्ये ठेवली होती. मात्र, सोमवार (दि. 31) सकाळी रोजच्याप्रमाणे शेडमध्ये पाहिले असता शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या (Soybeans) 8 गोण्या अंदाजे 36 हजार रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला (Soybeans Theft) गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रविवारी (दि. 30) मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास सोयाबीन (Soybeans) गोण्याची चोरी करताना दोन चोरटे त्यांना दिसून आले आहे.

चोरट्यांनी सोयाबीनच्या गोण्यांवर मारला डल्ला
पंचनाम्यासाठी मागितले पैसे; कृषी सहायक निलंबित

अगोदरच नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या कष्टाने सोयाबीनचे शेतकर्‍याने उत्पादन घेतले. विक्रीसाठी साठवून सोयाबीन ठेवली असता चोरट्यांनी ती चोरुन नेली. आस्मानी संकटाबरोबरचं सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकर्‍यावर आली असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 200/2022 नुसार भारतीय दंड संहिता कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com