सोयाबीनने गाठला साडेसहा हजारांचा टप्पा

आणखी भाव वाढीचा अंदाज; गड्या उसापेक्षा सोयाबीन बरी
सोयाबीनने गाठला साडेसहा हजारांचा टप्पा

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

शेतकर्‍यांनी सोयाबीन (Soybean) विक्रीमध्ये घाई न केल्याने पुरवठ्याअभावी सोयाबीनचे बाजार (Soybean Market) दररोज वाढतांना दिसत आहे. येत्या काळातही आणखी भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चालू वर्षी सोयाबीनचे (Soybean) सरासरी उत्पन्न चांगले मिळाल्याने व बाजारभावही बर्‍यापैकी असल्याने उसासारख्या (Sugar Cane) बहुवार्षीक पिकापेक्षा चार महिन्यात येणारे सोयाबीन पीक (Soybean Crops) बरे अशी मानसिकता शेतकर्‍यांची झाली आहे.

उसासारख्या (Sugar Cane) बहु वार्षिक पिकाकडे शाश्वत उत्पन्न देणारे नगदी पीक (Crops) म्हणून पाहिले जाते. एकदा लागवड (Planting) केली की दोन तीन वर्ष हमखास उत्पन्न मिळते. मात्र त्यासाठी शाश्वत बारामाही पाणी व भांडवली गुंतवणुक करावी लागते. त्यातच वारंवार उसासारखी पिके (Sugar Cane Crops) घेतल्याने एकरी सरासरी उत्पन्न कमी होत आहे. ऊस तुटून जाणे, एफआरपी (FRP) प्रमाणे भाव मिळणे व मिळालेला भावाचे पैसे वेळेत खात्यावर वर्ग होणे हे एक दिव्य झाले आहे. वर्षभर पाणी भरून, काबाडकष्ट करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अवस्था परावलंबी झाली आहे. मात्र सोयाबीन पिकांचा (Soybean Crops) कालावधी अवघ्या चार महिन्यांचा असतो.

निसर्गाने साथ दिल्यास किंवा पाण्याची व्यवस्था असल्यास एकरी सरासरी उत्पन्न दहा ते बारा क्विंटलपर्यंत जाते. गेल्या वर्षी शेवट व चालू वर्षी सोयाबीच्या (Soybean) काढणी सिझनच्या सुरवातीपासूनच बाजारभाव टिकून आहेत. शासनाचे हमीभाव 3 हजार 950 प्रति क्विंटल असताना सोयाबीनचे बाजार वाढून 6500 पर्यंत पोहचली आहे.

शेतकर्‍यांना मागणी पुरवठ्याचे गमक कळाल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी अपेक्षित भाव येईपर्यंत सोयाबीन विकायची नाही असे धोरण घेतल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. वाढत्या बाजारभावामुळे शेतकर्‍यांना दोन पैसे जास्त मिळणार आहेत. शेतकर्‍यांनी विक्री बाबत असाच संयम ठेवला तर येत्या काळात भाव आणखी वाढण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे उसासारख्या वर्षातून एकदाच उत्पन्न देणार्‍या बहुवार्षिक पिकापेक्षा चार महिन्यात भरीव उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन शेती शेतकर्‍यांना नवा पर्याय मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com