शेतात सोयाबीनसारख्या पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली

शेतात सोयाबीनसारख्या पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली

राजुरी |वार्ताहर| Rajuri

शेतातील काढण्यासाठी आलेल्या सोयाबीनच्या पिकांमध्ये पाणी साचले (Soybeans Crops Under Water) असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय असा प्रश्न ? सध्या ग्रामीण भागातील अनेक भागात शेतकर्‍यांमध्ये सध्या पहावयास मिळत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून ग्रामीण भागातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला असून राजुरी (Rajuri), ममदापूर (Mamdapur), तिसगाव वाडी (Tisgav Wadi) , तांबेवाडी (TambewadI), नांदूर (Nandur), यादव मळा (Yadav Mala), वाखरी परिसर तसेच प्रवरा परिसरातील (Pravara Place) अनेक भागात सोमवारी रात्री व मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेतामध्ये काढण्यासाठी आलेला सोयाबीन सारखे पिकांमध्ये भरपूर पाणी साचले असल्यामुळे या सोयाबीनच्या पिकाला (Soybeans Crops) मोड फुटतात की काय असा प्रश्न सध्या अनेक शेतामध्ये दिसून येत असून यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता वाढू लागली असल्याने अशा पाणी साचलेल्या शेतकर्‍यांना सरकार कडून पंचनामे करून मोबदला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सोयाबीनसारख्या पिकाला भाव कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या मध्ये नाराजीचा सूर दिसून येत असून सासून ठेवलेल्या कांद्याला थोडाफार भाऊ मिळायला लागला असल्यामुळे ऐन दिवाळीत शेतकर्‍यावर शेतमजूर यांच्यामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या झालेल्या पावसाने ग्रामीण भागात रोगराईचे प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चिकनगुनिया, डेंगू, मलेरियासह करोनाचेही संकट पुढे उभे राहत असल्यामुळे एकूणच सर्वसामान्य जनतेमध्ये सध्या मोठी भीती निर्माण झाली असून त्यातच नगर जिल्ह्यामधील (Ahmednagar District) काही गावांमध्ये लॉकडाऊनचा धडाका सुरू झाला असल्यामुळे यातून आता सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व्यापारी यांनी ऐन सणासुदीच्या दिवसात आपला उदरनिर्वाह करावा तरी कसा याची चिंता वाढू लागली आहे.

Related Stories

No stories found.