सोयाबीन ठेवावी की विकावी ?

दरातील घसरणीमुळे शेतकरी द्विधा मनःस्थितीत
सोयाबीन ठेवावी की विकावी ?
सोयाबीन

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

सोयाबीन पेरणीपासून (Soybean sowing) ते काढणीपर्यंत शेतकर्‍यांना केवळ मेहनतच करावी लागलेली आहे. सोयाबीन (Soybean) बहरात असताना किडीचा प्रादुर्भाव आणि काढणीच्या प्रसंगी पावसाने सोयाबीन झोडपले यामुळे नेवासा तालुक्यातील जास्त पाऊस झालेल्या पट्यातील शेतकरी मेटाकूटीला आला आहे. आता समाधानकारक दर मिळतील अशी आशा होती तर दोन दिवसामध्ये चार हजाराने दर (Rate) घसरल्याने शेतकरी चिंतेत पडला असून तयार होणारी सोयाबीन (Soybean) विकावी की दरवाढीची प्रतिक्षा (Waiting for the price to rise) करत साठवून ठेवावी या द्विधा मनःस्थितीत सापडला आहे.

सोयाबीन (Soybean) हे खरिपातील (Kharip) हे मुख्य पीक (Crops) असून यावरच हजारो शेतकर्‍यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, गेल्या चार दिवसातील सोयाबीनचे घसरलेले दर हे शेतकर्‍यांना धडकी भरवणारे आहेत. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक यामध्ये शेतकर्‍यांची द्विधा मनस्थिती होत आहे.

15 दिवसापूर्वी सोयाबीनचे (Soybean) दर हे 8 हजार ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल होते. त्यामुळे पावसाने नुकसान झाले तरी वाढीव दरामुळे चांगले पैसे मिळतील अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र, नविन सोयाबीनची आवक सुरु होताच दर कमालीचे घसरलेले आहेत. नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) प्रवरासंगम (Pravarasangam) येथे खासगी व्यापार्‍यांकडून सोयाबीन खरेदी सुरू आहे दोन दिवसाच्या फरकाने सोयीबीनचे (Soybean) भाव थेट 5 हजार ते 6000 हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे भविष्यात अणखीन दर घटले तर अधिकचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीनची विक्री करावी का की भविष्यात दर वाढतील या आशेने साठवणूक (Storage) करावी अशी द्विधा मनस्थिती झाली आहे.

यंदाच्या हंगामातील नविन सोयाबीन बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे थोडे दर घटणार हे अपेक्षित होते पण अपेक्षेपेक्षाही जास्त घसरण ही झालेली आहे. अशा काळात शेतकर्‍यांनी जेवढी पैशाची आवश्यकता आहे त्या प्रमाणातच सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे.

आवक वाढल्याने दरामध्ये अस्थिरता आहे. भविष्यात आवक किती होणार आणि कोणत्या स्टेजला सोयाबीनचे दर स्थिर होणार हे पहाणे महत्वाचे राहणार आहे. त्यानंतर दरामध्ये वाढ होण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाई न करता योग्य बाजार भावाची प्रतिक्षा करणेच फायद्याचे राहणार आहे.

नेवासा तालुक्यात यावर्षी 6 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन

परिसरात मोठ्या प्रमाणात कापसाचीही लागवड केली जात होती. मात्र, कापूस पीक उशिरा निघत असल्याने नंतर कांदा पीक घेण्यास उशीर होतो त्यामुळे गेल्या चार वर्षापासून सोयाबीनलाच अधिकची पसंती दिली जात आहे. नगदी पीक आणि योग्य दर यामुळे यंदा नेवासा तालुक्यात तब्बल 6117 हेक्टरावर पेरा झाला होता. यामधून मोठ्या उत्पादनाची अपेक्षा होती पावसाच्या लहरीपणामुळे पिकाचे नुकसान झाले आहे तर आता दर कमी होत असल्याने चिंता वाढलेली आहे.

Related Stories

No stories found.