सोयाबीनची गाडी लुटणार्‍या दोघांना अटक

सव्वा लाख रुपयांचे 22 क्विटंल सोयाबीन जप्त
सोयाबीनची गाडी लुटणार्‍या दोघांना अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

चालकाच्या ताब्यातील सोयाबीनची पिकअप गाडी व रक्कम लुटल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना शनिवारी अटक करून त्यांच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीचे 22 क्विंटल सोयाबीन जप्त केले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. काल पुन्हा त्यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

याप्रकरणी डोगर शेवली (ता. चिखली जि. बुलढाणा) येथील पिकअप ड्रायव्हर विनोद डिगंबर साबळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी सुमारे 6.30 वाजेच्या सुमारास ते दि. 15 नोव्हेंबर 2021 रोजी 12.30 वाजेच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी 2 मोटार सायकलवर येऊन साबळे यांचा टिळकनगर चौकीपासून ते टाकळीभान परिसरातील रुक्मिणी मंगल कार्यालया जवळील पुलापर्यंत मोटार सायकलवरून पाठलाग केला. त्यातील पाहिल्या मोटारसायकलवरील दोघांनी बळजबरीने साबळे यांची सोयाबीनची लोड असलेली गाडी घेऊन नेवाशाच्या दिशेने घेऊन गेले तर दुसर्‍या दोघांनी साबळेंकडील रोख रक्कम 3500 रुपये बळजबरीने काढून घेतले.

साबळे व त्याचे साथीदारांना रेल्वे ओवर ब्रीजजवळील शेती महामंडाळाच्या मोकळ्या जागेत काटेरी झुडूपाजवळ एकाच ठिकाणी बराच वेळ थांबवून ठेवले व नंतर साबळे व त्याचे मित्रांंना पिकअप गाडीजवळ सोडल. पिकअपमधील सोयाबीनचा 30 क्विटंल माल बळजबरीने खाली करून चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी दीपक उर्फ डॅनी दिलीप बारसे (वय 33, रा. नांदुर, ता. राहाता) व मनोज लक्ष्मण सोडणार (वय 22 रा. नांदूर, ता. राहाता) यांना दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली. तपासादरम्यान त्यांनी गणेश शांताराम जाधव (रा. नांदूर, ता. राहाता) संदीप पारखे (रा. ममदापूर, ता. राहाता) व विवेक लक्ष्मण शिंदे (वय 25, रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) या साथीदारांची नावे सांगितली. यातील आरोपी विवेक लक्ष्मण शिंदे याला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी यापुर्वीच अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. अटक केलेल्या आरोपींनी माल कोणाला विकला याबाबत माहिती देऊन ठिकाण दाखवल्याने एकूण 1,25, 400 रुपये किमतीचे 2,200 किलो (22 क्विटंल) एकूण 42 कट्टे असा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. यातील दीपक ऊर्फ डॅनी दिलीप बारसे व मनोज लक्ष्मण सोडणार यांना न्यायालयाने दि. 22 नोव्हेंबर 2021 पासून दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे. गणेश शंताराम जाधव व संदीप पारखे हे दोघे पसार आहेत.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवी, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, सपोनि जीवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, रघुनाथ कारखेले, सायबर सेल पथकाचे पोलीस नाईक, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी सदरची कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com