सोयाबीनचे दर घसरले !

प्रतिक्विंटल 10 हजारांचा भाव 6 हजारांवर
सोयाबीनचे दर घसरले !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

मृग नक्षत्रातील पेरलेले नविन सोयाबीन (Soybeans) तयार होण्याच्या स्थितीत असतानाच 10 ते 11 हजारांवरून प्रतिक्विंटलला सोयाबिन (Soybeans) 6 हजारांपर्यंत खाली आले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष सोयाबीनच्या भावाकडे (Soybeans Rate) लागले आहे.

सोयाबीनचे दर घसरले !
१० हजाराच्या उच्चांकानंतर सोयाबीनमध्ये का झाली घसरण ?

जून, जुलै मध्ये सोयाबीनचे दर (Soybeans Rate) 10 हजारांच्या पुढे गेले होते. मध्यंतरीही 11 हजारांच्या पुढे गेले होते. परदेशात कॅटल फिड (Cattle feed abroad) म्हणून सोयाबीनचा वापर होतो. ड्राय ऑईल केक (Dry oil cake) (डीओसी) म्हणजेच पेंडचा वापर देशात तसेच विदेशात होतो. सोयाबीनपासून खाद्य तेला बरोबरच जनावरांसाठीचे खाद्य तसेच पोल्ट्रीसाठी खाद्य बनविले जाते. खाद्य तेलालाही भाव त्या काळात वाढले होते. याशिवाय करोनामुळे अंड्यांना मोठी मागणी वाढली होती. कोंबड्यांना दिले जाणारे सोयाबीनयुक्त खाद्यामुळे अंड्यांचा आकार चांगला होतो. अशी पोल्ट्रीधारकांची धारणा आहे. परिणामी अंड्यांना करोनामुळे चांगली मागणी असल्याने हे प्रोटिनयुक्त खाद्याची मागणी वाढली. देशांतर्गत भाव वाढण्याचे कारण सोयाबीन परदेशात निर्यात होत होते.

भाव वाढल्याने सरकारने सोयाबीन निर्यात बंद केली. (Soybean exports stopped) त्यामुळे सोयाबीनचे भाव (Soybean prices) गडगडल्याचे यातील जाणकार सांगतात. काल अस्तगाव येथे सोयाबिनचे दर 6 हजार रुपये क्विंटल इतके होते. जून मध्ये मृग नक्षत्रातील पडलेल्या पावसाने सुरुवातीला ज्यांनी पेरले होते. त्यांच्या सोयाबीन आता निघू लागल्या आहेत. काल श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) मालुंजा येथील काही शेतकर्‍यांनी सोयाबीन अस्तगाव (astgav) येथे विक्रीस आणली होती. या सोयाबीनला 6 हजार रुपये इतका भाव मिळाला.

भाव का खाली आले? यावर बोलताना अस्तगाव (astgav) येथील साईपुजा ट्रेडिंगचे संचालक संतोष गोर्डे म्हणाले, केंद्र सरकारने देशांतर्गत दर वाढल्याने 12 लाख मेट्रीक टन सोयाबीन डीओसी (ड्राय ऑईल केक ) हा उपपदार्थ जो आपला देश आगोदर निर्यात करायचा आता त्यास आयात करण्यास परवानगी दिली आहे. कारण सोयाबीनचे दर वाढल्याने पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्याचे दर वाढले होते. या सर्वच बाबींचा विचार करून केंद्राने आयातीस परवानगी दिली, त्यामुळे भाव कमी झाले, असे ते म्हणाले.

सोयाबीनची काढणी सुरु झाल्यानंतर व आवक वाढल्यानंतर भावात चढ उतार होऊ शकते. सोयाबीनचे भाव आताच्या पेक्षा फार कमी होणार नाहीत, असे जाणकार सांगतात. मात्र शेतकरी सुरुवातीला सोयाबीन विक्रीस आणतील का? हा प्रश्न आहे. ज्यांना आर्थिक अडचण भासेल तेच शेतकरी सुरुवातीला सोयाबीन विक्रीस आणतील. दिवाळीचा सण आणि पुढील पिके उभे करण्यासाठी येणारा खर्च यासाठी सोयाबीन काढण्याची शक्यता आहे. सोयाबिनचे दर 10 हजारांच्या पुढे गेल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु हे भाव सध्याच्या स्थितीमुळे स्वप्नवत ठरले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol and diesel prices) गगनाला भिडले आहेत. मात्र शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे भाव कुठे वाढले तर ते कमी होण्यास आणि निम्म्यापर्यंत खाली येण्यास वेळ लागत नाही. हेच शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे.

Related Stories

No stories found.