विक्रमी उत्पादनाचे शेतकर्‍यांचे स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस

विक्रमी उत्पादनाचे शेतकर्‍यांचे स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

खरिपातील सोयाबीन पिकास प्रारभी समाधानकारक अन् पोषक वाटणार्‍या पावसाने विक्रमी सोयाबीन उत्पादनाचे स्वप्न पाहणार्‍या शेतकर्‍यांचे परतीच्या पावसाने निव्वळ स्वप्न धुळीसच नाही मिळविले तर शेतातच सोयाबीन मातीमोल केले.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सोयाबीन काढणीच्या मुळावर उठला. 12 आक्टोबरनंतरच्या परतीच्या अनपेक्षीत पावसाने तर हाहाकार केला. शेतजमिनीत चिखलात बैलगाडी फसते तर ट्रॅक्टर हार्वेस्टर सोडाच, शेतमजूर टंचाई काळांत मजुराशिवाय पर्याय नसल्याने मजुरांची मागणी वाढली. एकरी दोन अडीच निघो की पाच क्विंटल सोयाबीन काढणीस साडेचार ते पाच हजार रुपये एकरी भांव ठरलेलाच आहे. मजुर येणे-जाणे, वाहतूक भाडे शेतकर्‍यांचे माथी. काद्यांचे भांव आता वीस रूपयापर्यत गेले. कांदा खराब होऊ लागल्याने ऑगष्ट, सप्टेंबर अखेर दहा बारा रूपये असताना सर्वसामान्य शेतकरी विकुन मोकळे झाले.

आता सोयाबीन काढणीकरता मजुरांना पैसा कसाबसा उभा केला. त्यातच बहुतांश काढणीचे सोयाबीन क्षेत्र मागे राहिल्याने. मजुर दिवाळीच्या सणाला तीन दिवस सुट्टी घेणार असल्याने.शेतात नुकसान होणारी सोयाबीन पाहुन शेतकर्‍याची दिवाळी उत्साहात कशी होणार? कष्टकरी शेतमजुरांची मुलाबाळांसह दिवाळी मात्र निश्रि्चत गोड ह़ोणार. शेतमजूरांची मजुरीची व्यवस्था तोडामोडा करून आर्थिक संकटातील शेतकर्‍यांनी केली. स्वत:साठी सोयाबीन तातडीने बाजारात नेऊन पैसा उपलब्ध करू शकत नाही. कारण पावसाच्या कचाट्यातून हातात घरी आलेले सोयाबीन वाळलेले खणखणीत नाही. ओलसर सोयाबीन घरी काही दिवस सुकवल्यावर बाजारभाव मिळेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com