सोनेवाडीत महिलेस मारहाण

दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
सोनेवाडीत महिलेस मारहाण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

सामायिक रस्त्यात पाणी का सोडले याचा जाब विचारल्याचा राग येऊन आरोपी प्रकाश राधाजी औटी व संतोष राधाजी औटी यांनी तालुक्यातील सोनेवाडी येथील महिलेला मारहाण व विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला ही सोनेवाडी येथील रहिवासी असून आपल्या दोन मुली, एक मुलगा यांच्यासह शेती करतात. त्यांच्याशेजारी आरोपी प्रकाश औटी व त्यांचा भाऊ संतोष औटी यांचा शेताचा एक सामायिक बांध आहे. शुक्रवार दि 22 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला घरी असताना त्यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यावर शेजारी शेतकरी आरोपी प्रकाश व संतोष औटी यांनी पाणी सोडले होते. त्याबाबत फिर्यादी महिलेने तुम्ही आमच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर पाणी का सोडले असा सवाल विचारला असता त्यांना राग आला व त्यांनी सदर महिलेस शिवीगाळ करून खाली पाडून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तिचा गळा व हात धरून तिला जवळ ओढून तू माझी सोबत चल असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर महिलेने पती व सासू सोडवण्यासाठी आली असता त्यामुळे संतोष औटी हा तेथे आला व त्याने सदर महिलेच्या सासूला ढकलून दिले व महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. आमच्या नादी लागले तर तुम्हाला कुर्‍हाडीने तोडून टाकून असा दम दिला. महिलेच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुसारे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.