सोनेवाडी परिसरात दमदार पाऊस

सोनेवाडी परिसरात दमदार पाऊस

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शनिवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. तर मुर्शतपुर परिसरात दुपारी बारा वाजता तासभर चाललेल्या या पावसाने चोहीकडे पाणीच पाणी केले. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करत असलेले शेतकरी या पावसाने सुखावला आहे.पेरणी योग्य पाऊस झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

काल शनिवारी दुपारी बारा वाजता मुर्शतपुर परिसरात जवळपास एक तास पाऊस झाला तर सायंकाळी पावणेसहा वाजता सोनेवाडी परिसरात एक तास पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शेत जमिनीत पाणी साचले होते. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतकरी आता शेतामध्ये पेरणी करतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com