सोनेवाडी, पोहेगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस

सोनेवाडी, पोहेगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी पोहेगांव चांदेकसारे वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला.

पोहेगांव सोनेवाडी चांदेकसारे परिसरात पाच वाजेनंतर दमट वातावरण तयार झाले होते. दमट वातावरण असल्याने घरात बसने मोठे जिकरीचे बनले होते. महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते.

काल संध्याकाळी पाच वाजेपासून हवामान बदलाला सुरुवात झाली. आणी संध्याकाळी सात नंतर वारा व विजेच्या कडकडाटासह या परिसरात पाऊस पडला. शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांदा काढणीला आला आहे तो शेतातच पडून आहे. त्यामुळे आपल्या शेतातील काढलेला माल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com