सोनेवाडी परिसरात बिबट्याची दहशत

सोनेवाडी परिसरात बिबट्याची दहशत

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात गेल्या 5 महिन्यांपासून बिबट्याची दहशत असून वारंवार बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी मागणी करूनही वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

रात्री सोनेवाडी डोर्‍हाळे रस्ता दरम्यान सोयाबीन काढण्यासाठी संभाजी बोंडखळ कुटुंबासमवेत शेतातून येत असताना त्यांना रामदास राऊत यांच्या शेततळ्यावर बिबट्या दबा धरून बसला असल्याचे लक्षात आले. बिबट्याला पाहताच त्यांची धांदल उडाली. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत तेथून पळ काढला. या परिसरात बिबट्यांची एक नव्हे तर दोन तीन बिबट्यांची संख्या आहे, असे शेतकरी वर्गातून सांगण्यात येते.

सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे व पोलीस पाटील दगू गुडघे यांनी वेळोवेळी विभागाच्या अधिकार्‍यांकडे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागणी केली आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसते. या बिबट्याला लवकरात लवकर वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com