सोनेवाडीत विद्युत मोटार चोरांना रंगेहाथ पकडले

सोनेवाडीत विद्युत मोटार चोरांना रंगेहाथ पकडले

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

संशयावररून पकडून आणलेल्या दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर बंदम चोप दिल्यानंतर विद्युत मोटारीची चोरी केल्याचे आरोपींनी कबुल केले. अरोपींनी चोरलेली मोटारही काढून दिली. ही घटना सोनेवाडी येथे घडली असून मुद्देमालासह ग्रामस्थांनी रमेश अंबादास कुदळे व सचिन रंगनाथ गांगुर्डे या दोन आरोपींना पोलिसांच्या हवाली केले. मोटारीमागे पाचशे रुपये कमिशन असल्याचे आरोपींनी ग्रामस्थांना सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे रविवारी गीताराम जावळे यांच्या शेतातील विहिरीवरून विद्युत मोटर दोन चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यावेळी चोरट्यांनी शेजारीच असलेले भाऊसाहेब मिंड यांच्याकडे रात्री बाराच्या दरम्यान तंबाखू मागीतली होती. दुसर्‍या दिवशी विद्युत मोटार चोरी गेल्याचे सकाळी गीताराम जावळे यांच्या लक्षात आले. त्यांनी मींड यांनी विचारणा केली असता रात्री तंबाखु मागणार्‍यां त्या दोघांवर मिंड यांनी संशय व्यक्त केला. गीताराम जावळे यांनी मोटर चोरांच्या घरी जाऊन त्यांना मारुती मंदिरात आणले. रमेश अंबादास कुदळे व सचिन रंगनाथ गांगुर्डे यांना ग्रामस्थांनी मारुती मंदिरात जोरदार चोप दिला.

चोप देताच त्यांनी गीताराम जावळे यांची मोटर चोरून आणण्याची कबुली दिली. चोरून आणलेली मोटर त्यांनी अनिल वायकर यांच्या गायीच्या गोठ्यात लपून ठेवली असल्याचे सांगितले. एका मोटारी मागे पाचशे रुपये कमिशन मिळत असल्याचे त्यांनी सागितले. पोलिसांच्या अगोदरच ग्रामस्थांनी चोरट्यांकडून गुन्हा केल्याचे कबूल करून घेतले. पोलीस पाटील दगू गुडघे यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. उपनिरीक्षक महेश कुशारे, गवसने व त्यांच्या टीमने सोनेवाडी येथे येत ग्रामस्थांच्या समोर या चोरट्यांकडून मोटर कुठे ठेवली असल्याचे वदवून घेतले. अनिल वायकर यांच्या गोठ्यात ठेवलेली मोटर मारुती मंदिरात आणण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना नेण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com