सोनईत महिलेचा अकस्मात मृत्यू

सोनईत महिलेचा अकस्मात मृत्यू

सोनई |वार्ताहर| Sonai

येथील नाईक वस्ती येथे मंगळवारी सकाळी 35 वर्षीय महिलेचा (Woman) राहत्या घरी संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याची घटना घडली. तपासकामी सोनई पोलीस सक्रिय झाले असून प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनईत महिलेचा अकस्मात मृत्यू
15 दिवस, 123 कोटींचे खर्च करण्याचे झेडपीसमोर आव्हान

याबाबत समजलेली माहिती अशी की, राधा अरुण माळी (वय 35) ही महिला राहत्या घरासमोर मृतावस्थेत पडल्याची खबर मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे (Sonai Police Station) प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत मयत माळी यांच्या मृतदेहास पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

सोनईत महिलेचा अकस्मात मृत्यू
एकच मिशन...जुनी पेन्शन

सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर घटनेची नेमकी स्थिती स्पष्ट होईल.

सोनईत महिलेचा अकस्मात मृत्यू
गाव तेथे गोदाम समिती नियुक्त
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com