सोनईत वाहतूक कोंडी झाली नित्याची बाब

कायमस्वरुपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
सोनईत वाहतूक कोंडी झाली नित्याची बाब

सोनई |वार्ताहर| Sonai

घोडेगाव व राहुरी रोडवरील चौकात अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे व बेशिस्तपणे मुख्य रस्त्यावर लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून छोट्या-मोठ्या अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असताना सोनई पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी गायब असून यात वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सोनई हे नेवासा तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपठेचे गाव असून शनीशिंगणापूरला दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यातच सोनई-राहुरी व सोनई-घोडेगावला होत असलेली प्रवाशी वाहतूक करणार्‍या रिक्षात नियमापेक्षा जास्त संख्येने प्रवाशी असतात हे सर्व वाहतूक कर्मचार्‍यांना दिसत असून यावर कारवाई का होत नाही? याविषयी चर्चा होत असते. या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही वाहने मुख्य रस्त्यावरच आडवी तिडवी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात यामुळे रोजच वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रवाशांचा खोळंबा होत असल्याने किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडणे रोजचेच झाले आहे.

एसटी बसेस बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येथून अवैधरित्या वाहतूक करणार्‍या गाड्यांत प्रवाशी भरण्यासाठी मोठी चढाओढ पहावयास मिळत आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघातही या चौकात घडलेले आहेत. त्यातच शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. यातून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी येथे लक्ष देण्याची गरज आहे.

बसस्थानक परीसरात होणारी वर्दळ व वाहतुकीची कोंडी सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी बसस्थानक परीसरात कायम वाहतूक पोलिसाची आवश्यकता असून मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे मोठे आव्हान सोनईत नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांचेसमोर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com