सोनई पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

अंमळनेर शिवारात कारवाई; ओमनी कारसह गज, सुरा, लाकडी दांडा, मिरचीपूड आदी साहित्य जप्त
सोनई पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई पोलिसांनी अंमळनेर ता.नेवासा येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली तर इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत सोनई पोलिसानी दिलेली माहिती अशी की, अमळनेर येथील चौकात टाकलेल्या छाप्यात अंधारात ओमनी कार व त्या जवळ पाच संशयित इसम आढळून आले. पोलिसांची चाहूल लागल्याने त्यांनी घटनास्थळाहून पलायन केले. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यातील तीन व्यक्तींना शस्रासह पकडले.

सागर संतोष गायकवाड (वय 25) रा. झापवाडी रोड घोडेगाव, रमेश केशव जाधव (वय 23) रा.रामनगर बिडकीन ता.पैठण व विकी पोपट जाधव (वय 27) रा. सलामपुरानगर पंढरपूर ता. जि.औरंगाबाद यांना अटक केली तर इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

पकडलेल्या आरोपी कडून मिरचीची पुड, लोखंडी गज, सुरा, लाकडी दांडा, 1000 रूपये किमतीचा मोबाईल फोन व एक लाख रूपये किमतीची मारूती ओमनी कार (एमएच 13 एन 6468) असा एकूण एक लाख एकहजार रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात भादंवि कलम 399, 402 सह भारतीय शस्र अधिनियम कलम 4/25 नुसार 151/2021 अंतर्गत गुन्हा रजिस्टर केला आहे.

आरोपींपैकी सागर संतोष गायकवाड याच्या विरूद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 4857/2020 भादवि 452, 323 तर दुसरा गुन्हा शिंगणापूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 20/2018 भादवि कलम 379 तर दुसरा आरोपी विकी पोपट जाधव याचे विरूध्द वाळूंज एमआयडीसी पोलीस स्टेशन औरंगाबाद येथे गुन्हा रजिस्टर नंबर 520/2015 भादवि कलम 394, 34 नुसार गुन्हे दाखल आहेत.

यापूर्वी दाखल आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती दिपाली काळेनगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सोनई ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. कर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, सहाय्यक उपनिरीक्षक संजय चव्हाण, पोलीस नाईक शिवाजी माने, पोलीस कॉन्स्टेबल बाबा वाघमोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मारूती पवार यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com