सोनईत रस्त्यांवर होतेय वाहतूक कोंडी

सोनईत रस्त्यांवर होतेय वाहतूक कोंडी

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनईत नवी पेठ रस्त्यासह गावातील सर्वच रस्त्यावर दुकानाचे साहित्य आल्याने वाहतुकीचा रोजच बोजवारा उडत आहे. ग्रामपंचायतला दुकानाचे साहित्य साईड गटारसह रस्त्यावरून काढण्यास सपशेल अपयश आल्याने या रस्त्यावर वाहनधारकांना कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

वर्तमानपत्रात आलेल्या बातमीमुळे ग्रामपंचायतने गावात फिरून फक्त तोंडी समज दिली की दुकानचे साहित्य शटरच्या आत लावून नवीन रस्त्यावरील साईड गटारवरही दुकानचे साहित्य मांडू नये. नाहीतर दंडात्मक कारवाई करत साहित्य जप्त केले जाईल ,असे सांगितले. दोन दिवस सर्व व्यापार्‍यांनी दुकानाचे साहित्य दुकानच्या आत लावले पण आता काही व्यावसायिकांनी नवी पेठेत ग्रामपंचायतीच्या नाकावर टिच्चून पुन्हा साईड गटारसह रस्त्यावरही साहित्य विक्रीसाठी लावल्याने छत्रपती संभाजी महाराज चौकात पुन्हा रोजच मोठी वाहतूक कोंडी होत आहे. यासंबंधीचे ग्रामपंचायतला निवेदनही दिलेले आहे. तरीही कुठलीही कारवाई झालेली नाही.

नवी पेठेत सर्वच व्यापार्‍यांची दुकाने लागूनच आहेत दुकानांच्या वरून विजेची मेन लाईन गेलेली आहे काही व्यापार्‍यांनी सावलीसाठी रस्त्यावर कापड बांधलेले आहे. यावर जर लाईटची वायर पडली तर मोठी आर्थिक हानी होण्याची भीती काही व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.याकडेही ग्रामपंचायत व वीज मंडळ का दुर्लक्ष करते? हा सवाल व्यावसायिकांना पडला आहे.

सोनईसह शिरेगाव, गणेशवाडी, लांडेवाडी,पानेगाव, खेडलेतील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करतात पण कायमच होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे कायमच हमरीतुमरीचे प्रसंग होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com