भरधाव कारच्या धडकेत पादचारी युवक ठार

कापड बाजारात तिसर्‍या दिवशीही महापालिकेची पोलीस बंदोबस्तात कारवाई
भरधाव कारच्या धडकेत पादचारी युवक ठार

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-राहुरी रस्त्यावरील (Sonai Rahuri Road) हॉटेल अशोका जवळ पायी चालत असलेल्या 26 वर्षीय युवकाला (Youth) भरघाव वाहनाने मागील बाजूने धडक दिल्याने यशवंतनगर येथील युवक ठार (Youth Death) झाला. या रस्त्यावर अपघाताची (Accident) मालिका सुरुच असल्याने रस्त्याने ये-जा असुरक्षित झाली असल्याने ग्रामस्थ व पालक अंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

भरधाव कारच्या धडकेत पादचारी युवक ठार
बेकायदा व्यवसायामुळेच गुन्हेगारीला बळ - ना. विखे

यशवंतनगर येथून रस्त्याने पायी चालत असलेल्या रामदास किसन गालफाडे या युवकास राहुरीकडून सोनईकडे (Rahuri Sonai Road)येत असलेल्या मारूती ब्रिझा (एमएच 12 व्हीसी 7825) या वाहनाने धडक (Vehicle Hit) दिली. या धडकेत युवक गाडीच्या बंपरला लागून पुन्हा सिमेंट काँक्रिट रस्त्यावर जोराने पडला. आसपासच्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी युवकास नगर येथील हॉस्पिटलला नेत असताना तो रस्त्याने मयत झाला.

भरधाव कारच्या धडकेत पादचारी युवक ठार
गावठी कट्ट्याचा धाक दाखवून व्यावसायिकास दीड लाखाला लुटले

ग्रामस्थांनी वाहनचालक व वाहन सोनई पोलीसांच्या (Sonai Police) ताब्यात दिले आहे. मयत तरुण हा मोलमजुरी करून कुटुंब चालवत होता. एक वर्षांपूर्वी याचा विवाह झाला होता. याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भरधाव कारच्या धडकेत पादचारी युवक ठार
1200 मल्लांसह 10 महाराष्ट्र केसरी छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेत उतरणार

8 दिवसांपूर्वीही याच रस्त्यावर अपघात (Accident) होऊन मोलमजुरी करणारे रवी खरारे (वय 43) पायी चालत सोनईकडे येत असताना भरघाव येणार्‍या वाहनाने उडवले होते. त्याच्यावर रूग्णालयात उपचार चालू असताना दोन दिवसांपूर्वी खरारे हे मयत झाले आहे.

भरधाव कारच्या धडकेत पादचारी युवक ठार
सण, उत्सवाच्या वर्गणी विरोधात एकवटले नगरचे डॉक्टर्स

आठ महिन्यांत वेळोवेळी झालेल्या अपघाताच्या संदर्भात रस्ते महामंडळाच्या अधिकार्‍यांशी गतिरोधकाविषयी चर्चा केली असता फक्त टोलवा टोलवीचे उत्तर मिळत आहे. याविषयी सोनई (Sonai) परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ गतिरोधक बसविण्यासाठी मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात असून लवकरच संबंधित विभागास निवेदन देवून आंदोलन करणार असल्याचे समजते.

भरधाव कारच्या धडकेत पादचारी युवक ठार
केजरीवाल दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे - अण्णा हजारे

यशवंतनगर ते सोनईपर्यंत शाळा महाविद्यालय असल्याने गर्दी जास्त असते. शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावर चालत असलेली बेकायदा प्रवासी वाहने वेग मर्यादा पाळत नसल्याने अनेकवेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. पोलीस यंत्रणा फक्त बघ्याच्या भुमिकेत राहते. याविषयी अनेकवेळा वर्तमानपत्रात मांडलेला गतिरोधकाचा प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेत नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com