सोनई-राहुरी रस्त्यावर आणखी एक अपघात; तिघे जखमी

सोनई-राहुरी रस्त्यावर आणखी एक अपघात; तिघे जखमी

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-राहुरी रस्त्यावरील हॉटेल अशोकासमोर रविवारी दुपारी स्विफ्ट कार व दुचाकीचा अपघात होऊन तीनजण गंभीर जखमी झाले. पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचे सत्र सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू झाली आहे. सोनईकडून राहुरीकडे जात असलेली स्विफ्ट गाडी (एमएच 14 सीसी 1995) व राहुरीकडून येत असलेली दुचाकी (एमएच 17 बीबी 9938) यांच्यात जोराची धडक होऊन अपघात झाला.

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना 108 रुग्णवाहिकेतून अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केलेले आहे. मागील आठवड्यातही असाच अपघात झाला असला तरीही पोलीस यंत्रणा किंवा रस्त्याचे ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसून अवैध प्रवासी वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे व ते वेगमर्यादेवर कुठलेही बंधन न ठेवता जोरदार वेगाने वाहने चालवत असताना पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत का आहे व एवढे अपघात होऊनही प्रशासन गतिरोधक बसवण्यास का टाळाटाळ करते? हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com