सोनई पोलिसांची 56 दुचाकी चालकांवर कारवाई

33 हजाराचा दंड वसूल
सोनई पोलिसांची 56 दुचाकी चालकांवर कारवाई

सोनई |वार्ताहर|Sonai

सोनई राहुरी रस्त्यावर सोनई पोलिसांच्या पथकाने 56 दुचाकी चालकांवर कारवाई करून 33 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. परिसरातील दोन सायबर कॅफेची तपासणी करून बैठक व्यवस्था बदलण्याची सूचना करत कलम 149 प्रमाणे नोटीस दिली.

सोनई-राहुरी रस्त्यावरील महाविद्यालय परिसरात टवाळखोर व वेड्यावाकड्या दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आलेने सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी शनिवारी पोलीस पथकासह 135 दुचाकी वाहन धारकांची तपासणी केली असता यात ट्रिपल सीट, विना हेल्मेट, फॅन्सी नंबर प्लेट, विना लायसन्स, हॉर्न मर्यादा न पाळणे याची तपासणी करून 56 वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करून 33 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला या कारवाई दरम्यान परिसरात असलेले दोन सायबर कॅफेची तपासणी केली असता मुला-मुलींना बसण्यासाठी कंपार्टमेंट तयार करून पडदे लावलेले आढळल्याने गैरकृत्य करण्याकरता अडोसा निर्माण करून दिल्याचे दिसून आल्याने कॅफे चालकांना कलम 149 प्रमाणे नोटीस देऊन बैठक लोकांच्या नजरेस पडतील अशी करण्याची सक्त ताकीद दिली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आदिनाथ मुळे, पोलीस नाईक रवींद्र गर्जे, गोरक्षनाथ जावळे, अमोल भांड, सचिन ठोंबरे, वैभव शित्रे व ज्ञानेश्वर आघाव यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com