सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत वॉरंटमधील 9 आरोपींना अटक

सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत वॉरंटमधील 9 आरोपींना अटक

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा (Newasa) येथील प्रथमर्ग न्यायालय तसेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून सोनई पोलीस ठाणे (Sonai Police Station) हद्दीतील विविध गुन्ह्यांतील प्राप्त अजामीनपात्र (एनबीडब्ल्यू) वॉरंटमधील (Warrant) 9 आरोपींना (Accused) वरीष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे (Sonai Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक माणीक चौधरी यांनी ताब्यात घेऊन न्यायालयात सादर केले.

सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत वॉरंटमधील 9 आरोपींना अटक
विवाहित तरूणाची सासुरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

जामीनपात्र (बीडब्ल्यू) वॉरंट मधील 5 आरोपींना वॉरंटची बजावणी करुन न्यायालयात हजर होणेबाबत सूचना देण्यात आल्या.

सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत वॉरंटमधील 9 आरोपींना अटक
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

सदरची कारवाई करण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, नगरचे अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, माणिक चौधरी, हवालदार प्रवीण आव्हाड, दत्ता गावडे, रविंद्र लबडे, काँस्टेबल मृत्युंजय मोरे, सचिन ठोंबरे, ज्ञानेश्वर आघाव, विठ्ठल थोरात, निखिल तमनर, श्री. गायकवाड व श्री. जवरे यांचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com