सोनईचे तत्कालिन निरीक्षक बागुलसह चौघे निलंबित

एसपींचे आदेश || गणेशवाडी येथील युवकास केली होती मारहाण
सोनईचे तत्कालिन निरीक्षक बागुलसह चौघे निलंबित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेशवाडी (ता. नेवासा) येथील युवकास समज देण्याच्या कारणाने पोलीस ठाण्यात अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस अंमलदार संजय चव्हाण, अनिल जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते या युवकास समज देण्याच्या नावाखाली सोनई पोलीस ठाण्यात बोलावून बेकायदेशीररित्या मारहाण केल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही संबंधित मुलाच्या नातेवाईक आणि गावातील नागरिकांनी केली होती. याप्रकरणी अधीक्षक पाटील यांनी या चौघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com