चांद्यात दोघा अवैध दारू विक्रेत्यांवर सोनई पोलिसांचे छापे

99 बाटल्या जप्त
चांद्यात दोघा अवैध दारू विक्रेत्यांवर सोनई पोलिसांचे छापे
File Photo

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (Chanda) येथील अवैध व्यवसायांवर सोनई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा चांद्यात दोन ठिकाणी छापा (Sonai police raided two places in Chanda on illegal businesses) टाकून बेकायदेशिर विनापरवाना दारू विक्री (Illegal sale of unlicensed liquor) करणारांवर थेट कारवाई करत जवळपास साडेदहा हजार रुपये किंमतीच्या 99 बाटल्या जप्त (99 bottles seized) केल्या. अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

येथील अमरधामसमोर चिंचेच्या झाडाखाली एका पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करताना (Illegal sale of unlicensed liquor) सचिन अण्णासाहेब बाजारे (वय 31) यास पकडले. त्याच्याकडून प्रत्येकी 52 रुपये किमतीच्या देशी दारू भिंगरी संत्राच्या 180 मिलीलीटरच्या 38 बाटल्या (एकूण किंमत 1976 रुपये) सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे (API Ramchandra Karpe) व त्याच्या पथकाने जप्त केल्या.

यासंदर्भात पोलीस नाईक शिवाजी नामदेव माने यांनी सोनई पोलिसांत (Sonai Police) दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 0235/ 2021 प्रोव्हीशन अ‍ॅक्ट 65(ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली.पुढील तपास हवालदार डी. एम. गावडे करत आहेत.

दुसर्‍या छाप्यात चांदा येथीलच आसिफ इसाक शेख (वय 25) रा. चांदा याच्याववर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 61 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये प्रत्येकी दीडशे रुपये किंमतीच्या इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या 180 मिलीलिटरच्या 20 बाटल्या (एकूण किंमत तीन हजार रुपये), 2700 रुपये किंमतीच्या मॅकडॉल रम 20 बाटल्या प्रत्येकी किंमत 135 रुपयेप्रमाणे, ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या 12 सीलबंद बाटल्या (एकूण 1440 रुपये), 1170 रुपये किमतीच्या मास्टर ब्लेंड कंपनीच्या 180 मिली च्या 9 सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 130 रुपये प्रमाणे असा एकूण 8310/ किंमतीचा माल जप्त करण्यात आला. पोलीस नाईक शिवाजी नामदेव माने यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार गुन्हा रजस्टिर नंबर 236/20े21 मुंबई प्रोव्हिशन अ‍ॅक्ट 65 (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली असून पुढील तपास हवालदार ए. बी. गायकवाड करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि चांदा ग्रामस्थांनी अवैध धंदे आणि दहातोंडे हत्येच्या तपासासाठी गाव बंद ठेवले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांद्यात छापासत्र सुरू करत अवैध धंद्याला लगाम लावण्यास सुरुवात केल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ विशेषतः महिला वर्गांने कारवाईचे स्वागत केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com