सोनई पोलिसांकडून गावठी कट्टा व काडतुसांसह एकजण जेरबंद

सोनई पोलिसांकडून गावठी कट्टा व काडतुसांसह एकजण जेरबंद

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत (Sonai Police Station) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत शास्त्रीनगर, चांदा, ता. नेवासा भागात राहाणारा सोनई पोलीस ठाण्यातील (Sonai Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक उत्तम फुलमाळी (वय 21) यास सोनई पोलिसांकडून गावठी कट्टा (Gavthi Katta) व जिवंत काडतुसासह (Live Cartridge) जेरबंद (Arrested) केले आहे.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांचे आदेशाने अवैध अग्नीशत्र विरुध्द विशेष मोहिमे अंतर्गत सोनई पोलीस ठाणे (Sonai Police Station) हद्दीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग यांचेकडील जारी झालेल्या सर्चवॉरन्टचे अनुषंगाने 28 मे रोजी सोनई पोलीस ठाण्याअंतर्गत (Sonai Police Station) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शास्त्रीनगर (चांदा) भागात राहाणारा अशोक उत्तम फुलमाळी (वय 21) याचे राहाते घराच्या जारी झालेल्या सर्च वॉरन्टचे आधारे सोनई पोलीसांनी (Sonai Police) शासकीय पंचाचे उपस्थीतीत घराची झडती घेतली असता सदर इसमाचे कब्जात राहाते घरामधुन 25 हजार रुपये किंमतीचे देशी बनवाटीचे पिस्तुल (गावठी कट्टा) (Gavthi Katta) स्टील प्लेटेट मॅगझीनसह, मुठीस दोन्ही बाजुस लाल रंगाच्या प्लास्टीक धातूच्या प्लेट्स लावलेल्या व त्यावर इंग्रजीत यूएसए व त्यापुढे स्टाफ असे चिन्ह व अक्षरे असलेले जुना वापर अंदाजे 200 रुपये किंमतीचे सदर पिस्तुलचे मॅगझीनमध्ये मिळून आलेले एक जिवंत काडतुस मागील गोलाकार भागावर केएफ 7.65 अशी अक्षरे, अंक असलेला असा 25 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमालासह सदर इसमास सोनई पोलिसांनी जेरबंद (Sonai Police Arrested) केले आहे.

सदर प्रकरणी अवैध अग्नीशस्त्र बागळले प्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे हवालदार अनंता गायकवाड यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं 171/2022 भारतीय शस्त्र अधिनियम कायदा 1959 चे कलम 3/25,7/25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी अशोक उत्तम फुलमाळी यास या दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुध्द यापूर्वी सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि नं 160/2021 आर्म अ‍ॅक्ट का.क. 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक निरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, नेवासा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहायक फौजदार संजय चव्हाण, हवालदार दत्ता गावडे,हवालदार अनंता गायकवाड, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे,कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे, कॉन्स्टेबल तमनर, कॉन्स्टेबल जावळे, कॉन्स्टेबल आघाव, महिला पोलीस कॉन्स्टेबल कमल आघाव, चालक कॉन्स्टेबल सुनिल ढोले, महिला पोलीस कॉन्स्टेबल मनिषा नरोटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल बेबी गोरे सर्व नेम सोनई पोलीस ठाणे यांनी ही कामगिरी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com