सोनई पोलिसांकडून विविध गुन्ह्यांतील 11 आरोपींना अटक

सोनई पोलिसांकडून विविध गुन्ह्यांतील 11 आरोपींना अटक

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा येथील प्रथमवर्ग न्यायालय तसेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून सोनई पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यांतील प्राप्त अजामीनपात्र (एनबीडब्ल्यू) वॉरंट मधील 6 आरोपी व विविध गुन्ह्यातील फरार असलेले पाच अशा एकूण 11आरोपींना अटक केली आहे.

वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पथकाने जामीनपात्र वॉरंट मधील 13 आरोपींना वॉरंटची बजावणी करून न्यायालयात हजर होणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोनई पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर 124/2023 भादवी कलम 326, 324, 143, 147 वगैरे मधील 18 मार्च 2023 पासून फरार असलेल्या पाच आरोपींना अटक केली आहे.

सदरची कारवाई करण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार प्रवीण आव्हाड, दत्ता गावडे, अंकुश दहिफळे, मच्छिंद्र आडकिते, काँस्टेबल मृत्युंजय मोरे, ज्ञानेश्वर आघाव, विठ्ठल थोरात, अमोल जवरे, महेंद्र पवार यांचा सहभाग होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com