सोनईच्या ‘यश ग्रुप’कडून गरजूंना 201 ऑक्सिजन सिलेंडर

सोनईच्या ‘यश ग्रुप’कडून गरजूंना 201 ऑक्सिजन सिलेंडर

सोनई |वार्ताहर| Sonai

गोरगरीब जनतेसाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी मदतीसाठी पुढे यावे या जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या आवाहनाला यश ग्रुपने प्रतिसाद देत शनैश्वर ग्रामीण रुग्णालयास 201 ऑक्सिजन सिलेंडर गरजेनुसार देण्यास प्रारंभ केला आहे.

याबाबत माहिती अशी की, कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा होणारा तुटवडा पाहता यश ग्रुपचे सदस्य राजेंद्र गुगळे यांनी ऑक्सिजन सिलिंडरबाबत आपल्या सहकार्‍यांसोबत विचार मांडले त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. शनी शिंगणापूर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सोपानराव दरंदले यांच्या स्मरणार्थ 101 ऑक्सिजनचे सिलेंडर दिले व अन्य सदस्यांनी 100 असे एकूण 201 ऑक्सीजन सिलेंडर शनैश्वर देवस्थानच्या ग्रामीण रुग्णालयात गरजेनुसार देणे सुरु केले आहे.

तालुक्यातील होम कॉरंटाईन असणार्‍या व्यक्तींची संख्या पाहता या ग्रुपने गरज असेल त्याला विनामोबदला घरपोच ऑक्सीजन सिलेंडर या उपक्रमाला खूप लोकांनी हातभार लावत रोख स्वरुपातील रक्कम यश ग्रुपकडे दिली आहे. त्यात यश ग्रुपचे सदस्य व इंजिनियर सुभाष शिरसाट यांनी 11 सिलेंडर, झी मराठीच्या मंचला ‘हवा येऊ द्या’च्या विशेष भागात काम केलेल्या अभिषेक बारहाते याने आपले मानधन या उपक्रमासाठी दिले.

राजेंद्र उंदरे व प्रदीप बोकरीया यांच्याकडून प्रत्येकी 10 सिलेंडर, अविनाश येळवंडे, संजय अरगडे, अतुल बोकरिया यांच्याकडून प्रत्येकी 5 सिलेंडर, स्वर्गीय मनोज वाघ यांच्या स्मरणार्थ धनगर गल्लीतील अहिल्यादेवी मित्र मंडळातील 19 मित्रांनी 19,500 रुपये, सोनईचे सरपंच धनंजय वाघ 10,000 रुपये, ग्रामपंचायत सदस्य नितीन दरंदले, किरण सोनवणे, दादा वैरागर, सचिन पवार यांच्याकडून 11,000, किरण चंगेडीया 15,000, ललीत चंगेडीया 5,000 इतकी रक्कम जमा केलेली आहे. असा मदतीचा ओघ सुरूच आहे.

मागील वर्षी करोना काळात याच गृपने सलग 39 दिवस दररोज दोन हजार जेवणाचे तयार डबे करुन गरजूंना वाटप केले होते. या वेळेस रुग्णांची खरी गरज लक्षात घेवून ग्रुपचे सदस्य गरजूंना ऑक्सिजन सिलेंडर देण्यासाठी झटत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com