सोनईत 32 तर नेवासा शहरात 15 बाधित

मुकिंदपूर येथे 9 तर चांद्यात 8 बाधित; 34 गावांतून 136 संक्रमित
सोनईत 32 तर नेवासा शहरात 15 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 34 गावांतून काल 136 करोना संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 32 संक्रमित सोनईत तर त्या खालोखाल 15 बाधित नेवासा शहरात आढळले.

मुकिंदपूर(नेवासाफाटा) येथे काल 9 तर चांदा येथे 8 करोना संक्रमित आढळले. घोडेगाव व राजेगाव येथे प्रत्येकी 6 तर माका येथे 5 संक्रमित आढळून आले.

भेंडा बुद्रुक, देवगाव, महालक्ष्मी हिवरे व वांजोळी या चार गावांतून प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

कुकाणा व बर्‍हाणपूर येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले. पाचेगाव, वडाळा बहिरोबा, निंभारी, देवसडे, भानसहिवरा या पाच गावातून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

टोका, शिरेगाव, शिंगवेतुकाई, सलाबतपूर, नेवासा बुद्रुक, रांजणगाव, नजिकचिंचोली, करजगाव, खुणेगाव, बेलपिंपळगाव, जळका, हंडीनिमगाव, गणेशवाडी व भेंडा खुर्द या 14 गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे 34 गावांतून 136 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 5 हजार 552 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com