सोनईत 34 स्त्री-पुरुषांवर 9 गुन्हे दाखल
सार्वमत

सोनईत 34 स्त्री-पुरुषांवर 9 गुन्हे दाखल

मास्क न लावता मॉर्निंग वॉक

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असताना व सोनई प्रतिबंधित क्षेत्र घोषित असताना सोमवारी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान सोनई-राहुरी रस्त्यावर मास्क न वापरता मॉर्निंगवॉक करणार्‍या 34 महिला व पुरुषांवर सोनई पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोनई येथील भराडे खानावळ समोर, शिंगणापूर कमानीपुढे, सोनई बसस्टँड व मुळा बाजारसमोर सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे, यांनी कारवाया केल्या. भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 व 3 नुसार सोनईतील रहिवाशी असलेले व मास्क न घालता प्रशासनाचे आदेशाचे उल्लंघन करण्याच्या आरोपावरून लहु सोपान आदमाने, अनिल अण्णासाहेब वाघमारे, सोमनाथ भाऊसाहेब औटी,

मकरंद अनंतराव जोगदे, मंगल मकरंद जोगदे, बापू ज्ञानदेव कुसळकर, दिलीप रामचंद्र शिंदे, प्रवीण चंद्रकांत एडके, ज्योती प्रवीण बडे, योगेश बहिरू टिमकारे, कुमार केशव माळवे, समीर दादासाहेब दरंदले, दत्तू किसन शिंदे, रमेश म्हसू कुसळकर, शरद जिजाबा गडाख, जयश्री शरद गडाख, नवनाथ काशिनाथ कुसळकर, दत्तू काशिनाथ कुसळकर, गोरख नामदेव कुसळकर, अभय बबन भळगट, रणजीत बाबुराव झाडगे, अशोक दगडू उदमले, गणेश गोपीनाथ लकडे, सुधीर अशोक कानवडे,

नामदेव गंगाधर बारहाते, संदीप मच्छिंद्र आढाव, सुनील दिनकर दरंदले, सोमनाथ माधव शिंदे, लक्ष्मण भाऊसाहेब परदेशी, कैलास छबू वैरागर, राजेंद्र बापू डोळसे, व्यंकटेश रामस्वामी पालेपवार, सतीश रामू शिंदे, सुरेश जयराम भोगे या सर्वांविरोधात गुन्हे रजिस्टर नंबर 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243 गुन्हे दाखल झाल्याने सोनईत खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com