लॉकडाऊन काळात सोनईत 59 हजारांच्या देशी दारूची चोरी
सार्वमत

लॉकडाऊन काळात सोनईत 59 हजारांच्या देशी दारूची चोरी

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

सोनई येथे 9 जुलैचे सायंकाळी 5 ते 24 जुलै चे सकाळी 10 या काळात सोनई नवी पेठ भागातील सरकारमान्य देशी दारू दुकान फोडून 58 हजार 500 रुपये किमतीची दारू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून या बाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की व्यंकटेश रामस्वामी पालेपवार (वय 45) धंदा- व्यापार याने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की 9 ते 24 जुलै दरम्यान नवी पेठ सोनई येथील देशी दारूचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडून देशी दारू संत्रा 20 बॉक्स किंमत 45 हजार रुपये तसेच देशी दारू बॉबी संत्रा 6 बॉक्स किंमत 13 हजार 500 अशी 58 हजार 500 रुपयांची देशी दारू पश्चिम बाजूच्या भिंतवरील पत्रा फोडून आत प्रवेश करून चोरून नेली.

याबाबत सोनई पोलीस ठाण्यात भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण आव्हाड, कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे पुढील तपास करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com