सोनईत देशी दारुची बेकायदा विक्री
File Photo

सोनईत देशी दारुची बेकायदा विक्री

दोघांकडून 96 बाटल्या जप्त

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-बेल्हेकरवाडी रोडवर (Sonai-Belhekarwadi Road) विनापरवाना बेकायदा देशी दारुची विक्री (Illegal sale of unlicensed native liquor) करणार्‍या दोघांवर सोनई पोलिसांनी (Sonai Police) गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून देशी दारुच्या (Native liquor) 96 बाटल्या जप्त (Seized) केल्या आहेत.

याबाबत सोनई पोलीस ठाण्याकडून (Sonai Police Station) समजलेली माहिती अशी की, सोनई-बेल्हेकरवाडी रोड (Sonai-Belhekarwadi Road) वरील पाण्याच्या टाकीजवळ श्रीकांत सुदर्शन पालेपवार (वय 32) रा. सोनई ता. नेवासा व रणजीत बाबुराव झाडगे (वय 40) रा. सोनई ता. नेवासा या आरोपींकडून 5 हजार 760रुपये किमतीच्या देशी दारु संजीवनी संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 96 सीलबंद क्वार्टर साईज बाटल्या विनापरवाना बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने सापडल्या. त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच 17 एएफ 0660) असा एकूण 15 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी (Sonai Police) महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार श्री. गर्जे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com