
सोनई |वार्ताहर| Sonai
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला दिले आहेत. मंगळवार व बुधवारी सोनई, घोडेगाव, शिंगणापूर परिसरात छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे
सोनई परिसरात छत्रपती चौकातील टपरीच्या आडोशाला, रविराज फोटो स्टुडिओच्या समोरील टपरीच्या आडोशाला, मोटार रिवायडींग दुकान शेजारील गाळ्याच्या आडोशाला, घोडेगाव चौफुला, घोडेगाव बस स्थानकामागे, घोडेश्वरी मंदिराजवळ, शिंगणापूर-घोडेगाव रस्त्यावरील शनी महात्मा पार्किंग समोरील टपरीच्या आडोशाला, शिंगणापूर-सोनई रस्त्यावरील कुर्हाट पार्किंग या सर्व ठिकाणी छापे टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून अनिल लक्ष्मण कुसळकर, अशोक उर्फ पप्पू हारदे, संजय सुधाकर भोसले, संतोष राजाराम कुसळकर, संतोष रंगनाथ साळवे, संभाजी हनुमंत बर्हाटे, पप्पू टेमकर, किशोर आनंदा शेंडे, संतोष हिरामण पवार, गोरक्षनाथ बबन काशीद, दीपक जगन्नाथ साळवे या सर्वांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस नाईक सचिन अडबल, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, हवालदार चंद्रकांत कुसळकर, कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी केली आहे.