हॉटस्पॉट सोनई
हॉटस्पॉट सोनई
सार्वमत

हॉटस्पॉट सोनईत दुकान सुरू ; विक्रेता व ग्राहकावर गुन्हा दाखल

विनाकारण फिरणार्‍या तिघांच्या मोटारसायकली जप्त करून गुन्हे दाखल

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

प्रशासनाने सोनई गाव हॉटस्पॉट घोषित केले असतानाही सोनईत किराणा दुकानातून सामान विकणार्‍या व्यावसायिकास तसेच सामान खरेदी करणार्‍या ग्राहकास त्याचबरोबर विनाकारण दुचाकी घेऊन फिरणारे तिघे अशा एकूण 5 जणांवर काल सोनई पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्रशासनाचा सोनईत हॉटस्पॉट जाहीर असतानाही 12 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता सोनई मेन पेठेतील किराणा दुकान चालविले म्हणून किशोर शांतिलाल भळगट रा. सोनई तसेच सचिन रामेश्वर कांबळे, रा. लोहगाव रोड सोनई या किराणा दुकानात जाऊन किराणा माल खरेदी करून हॉटस्पॉट पॉकेट क्षेत्रात मुक्तपणे संचार करून प्रशासन आदेशाचे उल्लंघन केले आहे

म्हणून सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचे पोलीस कर्मचारी सचिन कारभारी ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून किराणा दुकानदार किशोर शांतिलाल भळगट व माल खरेदी करणारा सचिन रामेश्वर कांबळे राहणार लोहगाव रोड सोनई या दोघा आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 269, 270 साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 2 व 3 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) प्रमाणे 227/2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तसेच सोनई हॉटस्पॉट पॉकेट प्रतिबंधक क्षेत्र घोषित असताना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशाचा भंग करून मोटरसायकलवर विनाकारण फिरताना महादेव शिवाजी जाधव रा. सोनई एमएच 17 बीआर 9736 सागर शिवाजी कुर्‍हे राहणार राघू हिवरे तालुका पाथर्डी (एमएच 16 बीके 1263) मंगेश मधुकर गुंजाळ रा. वांबोरी ता. राहुरी बिगर नंबरची पल्सर मोटरसायकल सोनई येथील आंबेडकर चौकात मिळून आले.

म्हणून तीनही आरोपींवर भादंवि कलम 188, 269, 270 साथ रोग प्रतिबंधक कायदा कलम 2 व 3 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ मुळे यांच्या फिर्यादीवरून 226/2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेल्या तिन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सोनईत हॉटस्पॉट घोषित झाल्याने सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. कुठलेही गैरकायदा वर्तन करू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा मोडणार्‍यांवर कारवाया चालूच राहतील.

- जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनई

Deshdoot
www.deshdoot.com