सोनईतील एका मोठ्या किराणा दुकानात छापा; कारवाईबाबत गुप्तता

सोनईतील एका मोठ्या किराणा दुकानात छापा; कारवाईबाबत गुप्तता

सोनई |वार्ताहर| Sonai

येथील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ठोक किराणा दुकानात सोनई पोलिसांनी छापा टाकला. पण या कारवाईची गुप्तताच पाळली जात असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ठोक किराणा दुकानात सोनई पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. बर्‍याच वेळ चाललेल्या या कारवाईत काहीतरी गौडबंगाल झाले असल्याची उघड चर्चा बोलली जात आहे. नेवासा तालुक्यातील हे किराणाचे ठोक दुकान असताना हा छापा फक्त दाखवण्यापुरता तर नाही ना? याची शंका येत असून राज्यात सुगंधी तंबाखू, मावा, गुटखा सर्वत्र बंदी असताना मग परीसरात छुप्या मार्गाने मिळतो कसा? हाच तपासाचा विषय आहे.

परिसरातील घोडेगाव, लोहगाव, खेडले, करजगाव, शिंगणापूर, वडाळा येथील पान टपर्‍यांसह या ठिकाणासह शेवगाव व राहुरी तालुक्यातील दुकानदारही या ठिकाणाहूनच गुटखा, सुगंधी तंबाखू, माव्यासाठी लागणारी सुपारी घेऊन जात असल्याची खत्रीलायक माहिती मिळाली. हे ठिकाण सोनईतील वर्दळीच्या परिसरातील असून या दुकानदाराचे गावात ठिकठिकाणी गोडाऊन असल्याचीही माहिती मिळाली.

या कारवाईची चर्चा गावात झाल्याने पोलिसांनी किरकोळ कारवाई दाखवून दुकानातील कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. याविषयी पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com