सोनईतील मारुती मंदिराची दानपेटी फोडली

चिल्लर ठेवली; 25 ते 30 हजारांच्या नोटा लंपास
सोनईतील मारुती मंदिराची दानपेटी फोडली

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई (sonai) येथील भाजीमंडई (Vegetable Market) जवळील मारुती मंदिरातील दानपेटी (Donation box) अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडून अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.

सोनई (Sonai) येथील नदीपात्रातील (River) ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदिर येथे बुधवारी सकाळी भाविक दर्शनाला आल्यानंतर दानपेटी फुटल्याचे लक्षात आले. ही बातमी काही वेळातच गावात समजल्यानंतर मंदीर परीसरात ग्रामस्थ व भाविक जमा झाले. दानपेटीचे कुलूप (lock of the donation box) तोडले असल्यामुळे दानपेटीतील चिल्लर मोजली असता ती 4 हजार 717 रुपये भरली. चोरटे पेटीतील फक्त नोटा घेऊन पळाले असावे असा अंदाज आहे.

मंदिराचे व्यवस्थापन पाहत असलेले ग्रामस्थ चार ते पाच महिन्यांतून एकदा दानपात्रामधील देणगी रक्कम मोजून मंदिराच्या देखभालीसाठी वापरत होते. हे दानपत्र 22 मे रोजी शेवटचे उघडले होते. त्यावेळी 33 हजार एवढी रक्कम या दानपात्रातून होती अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापन पाहत असलेल्या व्यक्तीने सांगितले. हाच अंदाज घेऊन 25 ते 30 हजाराची चोरी झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

फिर्याद देणार कोण...?

या घटनेविषयी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली नसल्याची माहिती समजली. मंदिराचे व्यवस्थापन पाहत असलेल्या व्यक्ती या वयोवृद्ध असून या घटनेची फक्त माहिती पोलीस ठाण्यात एकाने जाऊन दिली आहे. त्यावर पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचे समजते. एवढी मोठी रक्कम जाऊनही गावातील एकानेही फिर्याद दाखल करण्यास पुढाकार घेतला नसल्याची खंत मंदिर परिसरात बसणारे वयोवृद्ध भाविक व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.