
सोनई|वार्ताहर|Sonai
डम्पर अडविल्याचे गैरसमजातून यशवंतनगर भागात राहणार्या तरुणांसह दोघा अनोळखींनी कारमध्ये घालून अपहरण केले. गावठी कट्टा, गिरणीचा पट्टा व लाकडी दांड्याने मारहाण करून दात पाडला अशी तक्रार सोनई शनिशिंगणापूर रस्त्यावर राहणार्या हॉटेल व्यवसायिकांने दिल्याने सोनई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की अहमदनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत असलेल्या संतोष पोपट बारहाते (वय 41) याने दिलेल्या जबाबात म्हटले की, 24 जुलै रोजी खेडले परमानंद रोडवर असणार्या एका दवाखान्यासमोर फोनवर बोलत उभा असताना सोनई गावातून पांढर्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार मधून तिघे आले.
ड्रायव्हर सीटवरून राहुल पद्माकर दरंदले हा तरुण माझ्याकडे आला व माझ्या डोक्याला गावठी कट्टा लावून गाडीत बस असे म्हणाला. मी घाबरुन गाडीत बसलो गाडीत अन्य दोघेजण होते. मला गाडीतून वळण (ता. राहुरी) येथे घेऊन गेले. कार मुसळवाडी रोडने नेल्यानंतर राहुलने गावठी कट्टा तोंडावर मारून दात पाडला तसेच अनोळखी दोघांनी फाईटने मारले गाडी खाली घेऊन माझे डोक्यात, डोळ्यावर, तोंडावर, कंबर छाती मांडीवर मारहाण केली.
रात्री 2 वाजता माझे घरा समोर आणून टाकले हातातील घड्याळ व खिशातील 30 हजार माझ्याजवळ नव्हते ते त्यांनीच काढून घेतले असावेत या जबाबावरुन सोनई पोलीस ठाण्यात आरोपी राहुल पद्माकर दरंदले रा. यशवंतनगर सोनई व त्याचे दोन अनोळखी साथीदाराविरुद्ध भादवि कलम 326, 329, 365, 324, 323, 504, 506, 34 व आर्म अॅक्ट 3 व 25 प्रमाणे 272/2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हवालदार प्रवीण आव्हाड पुढील तपास करीत आहेत.