
सोनई |वार्ताहर| Sonai
प्रथमवर्ग न्यायालय नेवासा जिल्हा व अति सत्र न्यायालय (Newasa District and High Sessions Court) नेवासा यांच्याकडून विविध गुन्हयामधील प्राप्त वॉरंट मधील १४ आरोपींना (Accused) वरिष्ठांच्या सूचनेवरून सोनई पोलीस ठाण्याचे (Sonai Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी ताब्यात घेऊन अटक (Arrested) केली.
जमीनपात्र वॉरंटमधील ५ आरोपींना वॉरंटची (Warrant for the Accused) बजावणी करून न्यायालयात हजर होणे बाबत सूचना दिलेल्या आहेत. अटक केलेले आरोपी हे सोनई, लोहगाव, पानसवाडी, घोडेगाव, चांदा, गणेशवाडी परिसरातील आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुदर्शन मुंडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी केली.