सोनई पोलिसांनी वाळू चोरीचा टेम्पो पकडला

मांजरीच्या दोघांवर गुन्हा दाखल
सोनई पोलिसांनी वाळू चोरीचा टेम्पो पकडला
file photo

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-कांगोणी रस्त्यावरुन रात्रीचा फायदा उठवत वाळूची चोरटी वाहतुक करत असलेल्या टेम्पोसह दोन आरोपीस सोनई पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सोनई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार दि.26 मे च्या रात्री सोनई-कांगोणी रस्त्यावर पोलीस पथकाने छापा टाकून चोरटी वाळू वाहतुक करणारा टेम्पो (एमएच 12 5633) सह आरोपी सचीन रामदास माळी व विक्रम सुभाष माळी (दोघे रा. मांजरी ता.राहुरी) यांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मृत्यूंजय मोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर 183/2021 भारतीय दंड विधान कलम 379 व पर्यावरण कायदा 3/15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व ज्ञानेश्वर थोरात यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. एक लाख रुपये किंमतीचा टेम्पो व पाच हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार एच. एम. गर्जे करत आहेत.

मुळा नदीवरुन मोठ्या प्रमाणात वाळूचोरीचे रॅकेट कार्यरत असून ही वाहतूक सोनई येथूनच होत आहे. रात्री होत असलेल्या या प्रकारात अनेकदा ‘अर्थपुर्ण’ व्यवहार होत असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com