व्यापार्‍याच्या मुलावर गोळीबार करून पैशाची बॅग पळवली

व्यापार्‍याच्या मुलावर गोळीबार करून पैशाची बॅग पळवली

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नेवासा येथील प्रतिष्ठित व्यापारी मुथा मेडिकलचे संचालक मुथा बंधू यांच्या बंगल्यासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार करून त्याच्या हातातील सुमारे नव्वद हजार रुपयांची बॅग लांबविल्याची धक्कादायक घटना घडली.

नेवासा -खडका रस्त्यावर मुथा बंधू यांचे दोन बंगले असून त्याच ठिकाणी त्यांची मासफूड प्रॉडक्ट लिमिटेड कंपनी आहे. सायंकाळी साडेसहा वाजता नीरज अभय मुथा हा कंपनीतून घराकडे पैश्याच्या बॅगा घेऊन जात असताना रस्त्याच्या समोरील झाडीतून दोन जण त्याच्या दिशेने धावले व नीरजवर पिस्तुल रोखले व त्याच्या हातातील बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना नीरजचा होत असलेला विरोध पाहून पिस्तुलधारी हल्लेखोराने त्याच्या दिशेने गोळी झाडली. दरम्यान त्याच्या हातातील एक बॅग घेऊन हल्लेखोर पळ काढत असताना दुसर्‍या साथीदाराने पुन्हा एक गोळी लोड केली. परंतु नीरज त्यांच्यामागे धावल्यावर चोरट्यांनी सोबत असलेल्या साथीदारांच्या मोटारसायकलीवर पळ काढला.

या घटनेचे चित्रण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.त्यानुसार या घटनेत चार ते पाच हल्लेखोर सायंकाळी सहाच्या सुमारास बंगल्यासमोर आले. त्यातील दोघे समोरच्या झुडूपात लपलेले असल्याचे दिसत आहेत व इतर तिघे बंगल्या शेजारील रस्त्यावर थांबलेले दिसत आहेत.

घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली.मुथा कुटुंबियांनी दरवाजामध्ये सापडलेल्या गोळीचे काडतुस व गोळी पोलिसांच्या हवाली केली. याप्रकरणी 394,307,3-25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com