जावयाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहाता व राहुरीतील सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

जावयाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहाता व राहुरीतील सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

सासूरवाडीतून पत्नीला आणायला गेलेल्या जावयाला सासरकडच्या लोकांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गंगापूर येथे घडली होती. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पत्नीसह सासरच्या पाच जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील मयत अनिल बाळासाहेब धाकतोडे (वय 23 वर्षे, रा. धाकतोडे वस्ती, गंगापूर ता. राहुरी) यांची पत्नी प्रगती ही काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरी लोणी ता. राहाता येथे गेली होती. मयत अनिल हा तिला आणण्यासाठी लोणी येथे गेला होता. त्यावेळी त्याची पत्नी व इतर आरोपींनी त्याला मारहाण करून शिवीगाळ केली होती. तेव्हा मयत अनिल हा त्याच्या घरी परत आला. सासरकडच्या लोकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने दि.17 ऑक्टोबर रोजी त्याच्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेबाबत सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

सुनिता बाळासाहेब धाकतोडे (वय 48 वर्षे रा. गंगापूर ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन रितसर फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी प्रगती अनिल धाकतोडे, सुगंधा नंदू तुपे, तेजस झिंझूडे तिघे रा. लोणी ता. राहाता तसेच राजेंद्र ठोकळ, मंगल राजेंद्र ठोकळ दोघे रा. राहुरी या पाचजणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पाचही आरोपींना राहुरी पोलिसांनी तात्काळ अटक करून गजाआड केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com