जावई-सासूच्या वादातून हाणामारी

बोल्हेगावातील घटना || परस्पर फिर्यादीवरून गुन्हे
जावई-सासूच्या वादातून हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जावई- सासू यांच्यात वाद झाल्याची घटना सोमवारी (दिनांक 15 मे) व मंगळवार (दिनांक 16 मे) बोल्हेगाव उपनगरात घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

43 वर्षीय सासूने दिलेल्या फिर्यादीवरून जावई व त्याच्या आईविरोधात विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात सासूने म्हटले आहे की, सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मी हॉस्पिटलमध्ये ड्यूटी करीत असताना जावई आमच्या घरी आला त्यावेळी माझा मुलगा व सुन हे घरी असताना त्याने त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मी मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता जावई याला त्याचे घरी जावून जाब विचारला असता त्याने मला शिवीगाळ करून खाली जमिनीवर पाडुन लाथाबुक्याने मारहाण केली. मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

जावईने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची सासू, मेव्हणा, पत्नी व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जावईने म्हटले आहे की, मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजता घरी असताना सासुने शिवीगाळ केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता मी व माझी पत्नी घरी असताना सासु, मेव्हणा, एक अनोळखी इसम घरात आले. सासूने आरडाओरडा करून शिवीगाळ केली.

त्यावेळी मी म्हणालो तुम्ही घराचे बाहेर जा, शिवीगाळ करू नका, त्यावेळी सासु हिने मला लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच पत्नी, मेव्हणा एक अनोळखी इसम यांनी प्लॉस्टिकचे पाईपने डोक्यात मारहाण केली. माझी आई भांडणे सोडवण्यासाठी आली असता तीला देखील मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबाची फिर्याद दाखल करून घेतली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com