सासुरवाडीच्या मंडळींनी जावयाला केली मारहाण
अस्तगाव |वार्ताहर| Astgav
सासुरवाडीची मंडळी अचानक आली. मुलगी हिसकावून घेतली आणि त्यांनी मारहाण केल्याची तक्रार राहाता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
अस्तगाव येथील सुरज बबन दिनकर यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज दिनकर यांचे सासरे दगु आव्हाड, योगेश आव्हाड, विशाल आव्हाड, लहानु सोळसे, माया लहानु सोळसे, ज्योती योगेश आव्हाड, नंदा दगू आव्हाड, छाया सुरज दिनकर, विलास चंदने सर्व राहाणार हिंगोणी, ता. वैजापूर हे सर्व सासुरवाडीकडील लोक असून ते दोन मोटारसायकल व लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एच 20 एफ यु 5071 मध्ये एकत्रितपणे जमून आपल्या घरासमोर येऊन आरोपी सासरा दगु आव्हाड याने आपली मुलगी हिसकावून घेवून हातातील लोखंडी रॉडने हातावर, पाठीवर मारून जखमी केले. सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी व फिर्यादीची आई आशा बबन दिनकर हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी व फिर्यादीची जखमी आई साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे औषधोपचार घेत असताना फिर्याद दिली. यावरून राहाता पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा रजि नंबर 225/2023 भादंवि कलम 324, 323, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. आर. कदम करत आहेत.