संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

अनैतिक संबंधात अडथळा करणार्यास चाकूने भोकसून ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने

भारतीय दंड संहिता 302 कलमान्यवये दोषी धरुन आजन्म कारावासाची व 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

फिर्यादी चंद्रकांत सोपान बढे हा अनैतिक संबंधात अडथळा करतो या कारणावरुन आरोपी समीर चाँदभाई पठाण, अकबर चाँदभाई पठाण, व एक महिला (सर्व रा. मेंढवण, ता. संगमनेर) यांनी फिर्यादी चंद्रकांत सोपान बढे व त्याचा भाऊ सोमनाथ सोपान बढे यांना शिवीगाळ दमदाटी करुन समीर चाँदभाई पठाण याने सोमनाथ सोपान बढे यास चाकुने भोकसून ठार मारले. संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे दि. 10 डिसेंबर 2014 रोजी दत्तू कदम यांचे केशकर्तनालय दुकानासमोर ही घटना घडली होती.

आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 156/2021 भारतीय दंड संहिता 302, 109, 323, 504, 506 सह 34 प्रमाणे दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक एस. डी. भामरे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश क्र. 2 श्री. भोसले याचे समोर झाली. सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मयताचा भाऊ, वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासणी अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच अतिरिक्त सरकारी वकील संजय वाकचौरे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी समीर चाँदभाई पठाण यास दोषी धरले व जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर इतर दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.

कामकाज अतिरिक्त सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार डी. आर. वाघ, पोलीस हेड कॉ. पी. डी. डावरे यांनी सहकार्य केले.