ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड वाहतूकदारांचा प्रश्न मार्गी

ऊस तोडणी वाहतूकदारांना युटेकने दिले चेक || 22 ऑक्टोबरपर्यंत मिळणार थकीत ऊसबिलाची रक्कम
ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड वाहतूकदारांचा प्रश्न मार्गी

पुणे |प्रतिनिधी|Pune

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने (Prahar Janashakti Party) संगमनेर (Sangamner) येथील युटेक (Utech) उर्फ श्री गजानन महाराज साखर कारखानाच्या (Shri Gajanan Maharaj Sugar Factory) पुण्यातील टिळक रोडवरील युटेक (Utech) कार्यालयावर मंगळवार दि.12 ऑक्टोबर रोजी टाळेठोक व ठिय्या आंदोलन (Movement) करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष रविंद्र बिरोले यांच्या पुतळ्याचे प्रदर्शन मांडले होते. ऊस तोडणी वाहतूकदारांना युटेकने जाग्यावरच चेक दिले असून 22 ऑक्टोबर पर्यंत थकीत ऊसबिलाची रक्कम मिळणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे (Abhijit Pote) यांनी दिली.

प्रहारचे पुणे जिल्हाध्यक्ष अनंत काळे, प्रहारच्या पुणे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूनम तावरे, जितेंद्र परदेशी, संदीप देवीदास नवले, अड पाडुरंग औताडे, कृष्णा सातपुते, महादेव आव्हाड, संजय आव्हाड, जालिंदर आरगडे, नागनाथ आगळे, संजय वाघ, विवेक माटा, राहुल गायकवाड, शारूख कुरेशी, शुभम बोरकर, अशोक कायंदे, चंद्रकांत सावंत, अक्षय जगताप यांच्यासह शेतकरी उपस्थित हे आंदोलन करण्यात आले.

युटेक साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक, वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणात थकीत बिल आहेत. ही थकीत रक्कम येत्या 22 ऑक्टोबर पर्यत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय ऊस तोडणी वाहतूकदारांचे तीन वर्षापासून थकीत असलेल्या रकमेचे चेक जागेवरच लगेच देऊन त्या संबधीचे बंधपत्र प्रहार संघटनेला दिल्याने आंदोलन स्थगित केले, असल्याची माहिती प्रहारचे नगरचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे (Abhijit Pote) यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com