शिर्डीतील साठवण तलावावर सोलर वीजनिर्मिती

जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत, महिन्याकाठी सुमारे पावणेचार लाखांची होणार बचत - नगराध्यक्ष गोंदकर
शिर्डीतील साठवण तलावावर सोलर वीजनिर्मिती

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत (Shirdi Nagar Panchayat) मालकीच्या कनकुरी रोडलगत असलेल्या सुमारे 40 एकर जागेवर 580 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावावर (drinking water storage pond) 1 हजार 494 सोलर पँनल प्रकल्प (Solar panel project) बसवून त्यामधून जास्तीत जास्त 0.5 मेगावँट वीजनिर्मिती होणार आहे. (power generation) यामुळे शिर्डी नगरपंचायतचे दरमहा पावणेचार लाख रुपयांची शंभर टक्के विजबिलाची बचत होणार असून अशाप्रकारचा साठवण तलावावर सोलर पँनलद्वारे वीजनिर्मितीसाठी शिर्डी नगरपंचायतचा जिल्ह्यातील पहिला एकमेव प्रकल्प असल्याची माहिती शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय शहर (International city) म्हणून नावाजलेल्या शिर्डी शहरात माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) व खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपंचायत विविध उपक्रम हाती घेत असून यामध्ये शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यात यशस्वी झाली आहे. तत्कालीन नगराध्यक्षा योगीताताई शेळके यांच्या कारकिर्दीत एकदा तर नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांच्या कार्यकाळात एकदा असे शिर्डी नगरपंचायतीस स्वच्छ शहराचा दोनवेळा पुरस्कार प्राप्त (Received the Clean City Award twice) झाला आहे. त्यानंतर विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेऊन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसर्‍यांंदा पुन्हा माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात नगरपंचायतीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला आहे. शिर्डी शहराची ओळख आता देशातील स्वच्छ शहरांमध्ये झाल्याने नगरपंचायतच्या वतीने नवनवीन प्रयोग सुरू हाती घेतले आहे.

केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत (Central Government's Amrut water supply schemes) शिर्डी नगरपंचायतच्या साठवण तलावावर सुमारे 1 हजार 494 सोलर पँनल बसवून त्यातून 0.5 मेगावँट वीजनिर्मिती (Power generation) करण्यात येत असून नगरपंचायतला महिण्याकाठी येणारे पावणेचार लाख रुपये विजबिलाची बचत होणार आहे. तर वर्षाकाठी जवळपास अर्धा कोटी रुपयांची बचत यामाध्यमातून होणार आहे. सदरचा प्रकल्पासाठी अतिरिक्त जागेचा वापर केला नसून तलावावरील जागेच्या किनार्‍यावर सर्व पँनल बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे 0.5 मेगावँट वीजनिर्मिती होणार असल्याने यापुर्वी नगरपंचातीस 0.3 विजेचा वापर आहे. यातून शिल्लक राहीलेली 0.2 मेगावॅट वीज महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपणीला (Electricity to Maharashtra State Electricity Distribution Company) विकणार असून त्यातून नगरपंचायतीच्या लाईटबिलात कपात होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे नगराध्यक्ष गोंदकर यांनी सांगितले.

शिर्डी नगरपंचायतीस विजवितरण कंपनीला विजबिलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विजबील भरावे लागते. त्यामुळे भविष्यात शिर्डी नगरपंचायतीच्या शहरातील पथदिवे तसेच कार्यालयासाठी वापरण्यात येणार्‍या विजबिलाची अशाचप्रकारे शंभर टक्के बचत करण्यासाठी या साठवण तलावातील पाण्यावर तरंगणारे सोलर पॅनल बसवण्याचा विचाराधीन असून याबाबतचा प्रस्ताव सादर करुन सदरचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी न.पं शिर्डी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com