उष्णतेचा चटका अन् सोसायटी निवडणूक उन्हाने कार्यकर्ते घायाळ

उष्णतेचा चटका अन् सोसायटी निवडणूक
उन्हाने कार्यकर्ते घायाळ

पिंप्री निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या सेवा सोसायटीच्या सध्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र मे महिन्याच्या उष्णतेने कार्यकर्ते घायाळ झाले असून वाढत्या उन्हाने प्रचारावर मर्यादा येत आहेत.

जिल्ह्यात सध्या सेवा सोसायटीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. गावागावातील आर्थिक सत्ता असलेल्या सेवा सोसायट्या ताब्यात असाव्यात यासाठी नेते व कार्यकर्ते पळापळ करताना दिसत आहे. सेवा सोसायट्यांचे सभासद कमी मात्र गावभराचे कार्यक्षेत्र असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी गावभर हिंडावे लागत आहे.

मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस अंतिम टप्यात असून अत्यंत कडक उन पडत आहे. उष्णतेने गेल्या कित्येक वर्षाचे उच्चांक मोडीत काढले आहेत. सेवा सोसायट्या ताब्यात राहाव्यात यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते धावपळ करताना दिसत आहे. प्रचारासाठी सोशल मिडाया, फोन, मेसेज असे अनेक पर्याय अंवलबविले जात आहेत.

मात्र एवढे करूनही सभासदांच्या प्रत्यक्ष संपर्कासाठी भेटीगाठी महत्वाच्या असतात. त्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते यांना सभासदांपर्यंत पोहचणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्या गावातील समर्थक नेत्यासह व कार्यकर्त्यासह प्रचारासाठी वाड्या वस्त्यांवर हिंडण्याची वेळ आली आहे. सध्या उष्णतेने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मात्र मंडळाचा झेंडा संस्थेवर फडकाविण्यासाठी कार्यकर्ते भर उन्हातान्हात जिवाचे रान करताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.